सिटी बँक घोटाळा : शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांची ईडीने केली तीन तास चौकशी

anandrao adsul - ED

मुंबई : सिटी को-ऑप बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीने सुमारे तीन तास चौकशी केली. आंनदराव अडसूळ या बँकेचे अध्यक्ष होते. अडसूळ यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते, असे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आनंदराव अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील मोठं प्रस्थ आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन आहे. आनंदराव अडसूळ हे गेल्या अनेक वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करतात. अडसूळ हे सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अध्यक्ष होते व त्यांचे नातेवाईक संचालक मंडळावर होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे एक हजार कोटींच्या आसपास होता. ही बँक गेल्या दोन वर्षांपासून बुडीत निघाली आहे.

कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीए मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली व अखेर बुडीत निघाली. अनेक पेन्शनर बँकेचे खातेदार होते, सगळे बुडाले. ठेवीदारांनी अनेकदा अडसूळ यांना भेटून मार्ग काढण्याची विनंती केली. पण आनंदराव अडसूळ यांनी कुणाचंही ऐकले नाही. यामुळे खातेदारांनी पोलिसात तक्रार केली.

गेल्या दीड वर्षात खातेदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अनेक लोकप्रतिनिधींनी सीबीआय, आरबीआय, राष्ट्रपती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, याची दखल ईडीने घेतली. याच अनुषंगाने अडसूळ यांना चौकशीसाठी बोलावले होते.

आरोप

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी ५ जानेवारी रोजी केला होता. सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये १३ – १४ शाखा आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहेत, असा आरोप रवी राणांनी केला होता. आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्याने दिली. आता खातेदारांना फक्त १ हजार काढता येतात. असे रवी राणा म्हणाले होते.

आणखी एका प्रकरणाची चौकशी

हे प्रकरण पीएमसी बँकेचे आहे. पीएमसी बँकेत बंधू यांनी ५५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यातील पैसे प्रवीण राऊत यांच्या मार्फत आनंदराव अडसूळ यांच्या संस्थेच्या खात्यात जमा झाले आहेत. या प्रकरणातही लवकरच अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER