ठाकरे सरकारची सर्कस सुरूच, तर जनतेची ससेहोलपट; भाजपचा टोला

Atul-Bhatkhalkar-Uddhav-Thackeray

मुंबई : राज्यातील करोनाचा (Corona virus) प्रादुर्भाव किंचितसा कमी झालेला असताना आता म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत. कोरोना आणि म्युकरमायकोसिस या दोन्ही आजारांमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरील उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल आढावा बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तर दुसरीकडे मात्र सरकारचे अन्य मंत्री याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. आणि यावरुनच भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

दादू घरी बसलेत, दादा अतिमहत्त्वाच्या बैठका घेतायत, टोपे एकटेच होम आयसोलेशनचा स्वत:च निर्णय घेतायत, तिसरे सरकारच्या जीआरलाच विरोध करत आहेत. ठाकरे सरकारची सर्कस सुरू आहे, जनतेची ससेहोलपट होत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा टोला भातखळकर यांनी लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button