दालचिनी – सुगंधी मसाला द्रव्य !

बिर्याणी (Biryani), मसालेभात, नारळीभात किंवा गोडा मसाला दालचिनी हमखास असतेच. सुगंधी मसाला पदार्थांपैकी एक. खडा मसाला असो वा वाटलेला मसाला दालचिनी (Cinnamon) एक वेगळाच फ्लेवर देते. दालचिनी जसे स्वयंपाकातील एक महत्त्वाचा मसाला तसेच अनेक व्याधींवरील उत्तम औषध देखील आहे.

आयुर्वेदात (Ayurveda) दालचिनीला अनेक पर्यायी नावे आली आहेत. उदा. उत्कट ( तीक्ष्ण सुगंधी द्रव्य) त्वक् ( खोडाची त्वचा प्रयोगार्थ वापरली जाते) मुखशोधन, सुरस, गहुगंध, गंधवल्क, हृद्य, मनःप्रिय, दारुसिता.

कायम हिरवे राहणारे उंच वृक्ष दालचिनीचे असते. जुन्या वृक्षाची त्वचा (साल) कोरडी भुरकट ठिसूळ असते. ही चवीला थोडी कडवट तिखट गोड असते. दालचिनी वृक्षाची पाने म्हणजे तमालपत्र किंव तेजपत्र याचाही आपण मसाल्यांमधे वापर करतो.

Dalchini ke fayde। हैरान हो जाएंगे आप दालचीनी के इन 5 फायदों को जानकर

  • दालचिनी मुखदुर्गंधी दूर करणारी तसेच हिरड्यांना मजबूती आणणारी आहे. मुखशोधन हे दालचिनीला पर्यायी नाव म्हणूनच आले आहे. मंजनाप्रमाणे याचा प्रयोग केल्यास दात मजबूत होतात. हिरड्या मजबूत होतात शिवाय मुखदुर्गंधी येत नाही.
  • दात किडल्याने दालचिनी च्या तेलात भिजविलेला कापसाचा बोळा दातात धरून ठेवल्यास दातदुखी बंद होते.
  • बऱ्याच जणांना चेहर्‍यावर काळे डाग पडतात. बऱ्याच स्त्रियांना प्रसुतीनंतर चेहर्‍यावर गालावर डाग पडायला सुरुवात होते. दालचिनी चेहऱ्यावर पडलेले वांग, काळे डाग दूर करते. दालचिनीची पातळ लेप लावल्यास चेहरा उजळतो.
  • दालचिनी दमा राजयक्ष्मा यात अतिशय उपयुक्त आहे. यातील cinnamic acid यक्ष्मानाशक म्हणजेच anti tubercular आहे.
  • सर्दी खोकला आवाज बसणे प्राणवह स्रोतसाचे सर्व आजारांवर दालचिनी उत्तम कार्य करते. जंतुघ्न व सुगंधी असल्याने दालचिनी कफदुर्गंधी नष्ट करणारी आहे.
  • सितोपलादि चूर्ण जे बऱ्याच जणांच्या ओळखीचे असेल त्याचे एक घटकद्रव्य दालचिनी आहे.
  • सर्दीने डोक दुखत असल्यास दालचिनी उगाळून लेप लावल्यास आराम मिळतो.
  • अरुचि, भूक न लागणे, पोटात जंत होणे या तक्रारींवर दालचिनी तोंडात चघळणे फायदेशीर ठरते.
  • या व्यतिरिक्त अनार्तव (मासिक पाळी न येणे) रक्तविकार, गर्भाशयशैथिल्य, यकृतविकार मूत्रविकार अशा विविध विकारात इतर औषधी संयोगाने दालचिनीचा वापर केला जातो.

असे हे सुगंधी मसाला द्रव्य प्रत्येक घरात असणारे अतिशय उपयुक्त !

ayurveda

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER