सिनेसृष्टीची निर्मिती करण जोहर किंवा त्याच्या बापाने केली नाही; कंगनाचा कांगावा सुरूच

Kangana Ranaut & karan Johar

मुंबई : अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येपासून कंगनाने जो कांगावा सुरू केला आहे. तो ती थांबवण्याचे काही नाव घेत नाहीये. शिवसेनेसोबतच आता तिने दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरवर निशाणा साधला आहे. सिनेसृष्टीची निर्मिती करण जोहर किंवा त्याच्या बापाने केली नाही, अशी टीका कंगनाने केली आहे. समाजवादी पक्षाचे मीडिया समन्वयक मनिष अग्रवालने केलेल्या ट्विटला प्रत्युतर देताना केलेल्या ट्विटच्या उत्तरात कंगनाने हे लिहीले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत ट्विटवर ट्विट करत कोणा ना कोणावर निशाणा साधत आहे. शिवसेना – कंगना रणौत शिवसेनेकडून थंडावला असला तरी, कंगनाचा शिवसेनेवर ट्विटरवॉर सुरूच आहे. त्यातच आता तिने बॉलिवूडचे जानेमाने दिग्दर्शक निर्माता करण जोहरवर घणाघात केला आहे.

काय म्हणाली कंगना –

सिनेसृष्टी फक्त करण जोहर किंवा त्याच्या बापाने बनवली नाही. दादासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार, कर्मचाऱ्यांनी, सैनिकांनी ज्यांनी सीमेचं रक्षण केलं, ज्या नेत्याने संविधानाचं रक्षण केलं, ज्या जनतेने तिकीट खरेदी करुन प्रेक्षकाची भूमिका पार पाडली, या आणि अशा अनेक लोकांनी सिनेसृष्टीची निर्मिती केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER