1 फेब्रुवारीपासून चित्रपटगृह सुरू होणार : जावडेकर

Prakash Javadekar - Cinema Halls

नवी दिल्ली : कोरोना (Corona) संसर्गाच्या काळात चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. त्यामध्ये चित्रपटगृह (Cinema Halls) मालकांचे बरेच नुकसान झालेले होते. टाळेबंदीनंतर शासनाकडून ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे खुले करण्याची परवानगी देण्यात आली होते. परंतु, सिनेमाप्रेमींसाठी आणि चित्रपट मालकांसाठी आंनदाची बातमी आलेली आहे. कारण, आता चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने खुले करण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय सुचना आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी सांगितले की, देशभरात १ फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शन सुचनांचे पालनदेखील करण्यात येईल. प्रेक्षकांनी जास्तितजास्त ऑनलाईन बुकींग करावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. एकदम गर्दी होऊ नये म्हणून दोन चित्रपट शोमध्ये थोडा वेळ घेतला जाणार आहे. प्रकाश जावडेकर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मसंबंधीदेखील भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की, ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिरीयल्ससंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. ओटीटीवरील चित्रपटे, सिरीजवर प्रेस कॉन्सिल, केबल टेलीव्हिजन आणि सेन्सॉर बोर्डचे नियम लागू होत नाहीत. त्यासाठी लवकरच काही नियम लागू करण्यात येतील, अशी घोषणा जावडेकरांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER