बॉलिवूडमधील दिग्गज सिनेमॅटोग्राफरने सोडला सिनेमा; ‘हे पूर्णपणे माझं नुकसान’ – कंगना

P. C. Sreeram - Kangana Ranaut

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेत (Shiv Sena) द्वंद्व युद्ध सुरू आहे. या युद्धात भाजप (BJP) कंगनाच्या पाठीशी ठामपणे ऊभी असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला असला तरी मुंबईला पाकव्याप्त काश्मिर म्हटल्यानंतर कंगनावर सर्वच स्तरातून तीव्र टीका झाली. त्यानंतर आता बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध सिनेमटोग्राफर आणि डायरेक्टर पीसी श्रीराम यांनीही कंगनाची साथ सोडल्याचे ट्विट करून सांगितले आहे.

कंगना रनौतची मुख्य भूमिका असलेला सिनेमा त्यांना ऑफर झाला होता. पण त्यांनी या सिनेमासाठी काम करण्यास नकार दिला असल्याचे सांगितले आहे. ‘ या सिनेमात कंगना रणौत मुख्य भूमिकेत असल्याने मला हा सिनेमा सोडावा लागला. मला मनातून चांगलं वाटत नव्हतं आणि मी मेकर्ससमोर माझी भूमिका मांडली ती त्यांनी समजून घेतली’. असे पीसी श्रीराम यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

श्रीराम यांच्या ट्विटनंतर कंगना रणौतनेही ट्विट केले व ‘मी तुमच्यासारख्या लीजंडसोबत काम करण्याची संधी गमावली सर. हे पूर्णपणे माझं नुकसान आहे. मला पूर्णपणे माहीत नाही की, तुम्हाला काय खटकतं होतं. पण मला आनंद आहे तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं. तुम्हाला शुभेच्छा’. असे कंगनाने त्यांना उत्तर दिले आहे.

कंगना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव आहे. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिज्म आणि त्यानंतर इंडस्ट्रीतील ड्रग्सच्या वापरावर धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केल्याने वाद आणखीनच पेटला. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिला हरामखोर मुलगी म्हटलं होतं. हा वाद पुढे इतका पेटला की, कंगनाला केंद्रातून वाय सुरक्षा पुरवण्यात आली. केंद्राकडून वाय सुरक्षा मिळवणारी कंगना एकमेव अभिनेत्री ठरली आहे. ती आज मुंबईत येत आहे. तर दुसरीकडे मनपाचे कर्मचा-यांनी तिच्या मुंबईतील कार्यालयावर हातोडा चालवण्यास सुरूवातदेखील केली आहे. कंगना मुंबईत आल्यानंतर अजून काय काय घडणार हे पाहण्यासारखे असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER