सिडकोच्या अधिका-याला लाच घेताना अटक

arrest

ठाणे :- हस्तांतरण करण्याकरिता 50 हजारांची लाच घेणा:या सिडकोच्या वसाहत विभागातील कार्यालयीन सहायक अधिकारी सुनंदा नामदेव गायकवाड यांना ठाणो सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी पी जाधव यांनी बुधवारी दोषी ठरवत पाच वर्षाची कैदेची शिक्षा सुनावली. तर याप्रकरणातील वसाहत अधिकारी संजीव ढोले आणि खाजगी व्यक्ती सुनील सरकार या दोघांची न्यायालयाने निदरेष मुक्तता केली असून या खटल्यात सहकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी काम पाहिले.

सोसायटीचा प्लॉट बिल्डरच्या नावावरून सोसायटीच्या नावे हस्तांतरण करण्याकरिता तिघांना तक्रारदारांकडून 50 हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी 6 जुन 2012 रोजी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.याचा तपास पुर्ण झाल्यावर त्याप्रकरणी आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल के ले होते.हा खटला ठाणो सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाल्यावर सरकारी वकील विवेक कडू यांनी सादर केलेले सबळ पुराव्यानिशी गायकवाड यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यानंतर बुधवारी 23 ऑक्टोबर दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 प्रमाणो 3 वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड तसेच कलम 13(2) प्रमाणो पाच वर्षे कैद व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तसेच ढोले आणि सरकार यांची याप्रकरणातून निदरेष मुक्तता झाली आहे. या गुन्ह्यात नवीमुंबई एसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी काम पाहिले.