भारतात या तारखेला प्रदर्शित होणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट ‘टेनेट’

Tenet

क्रिस्टोफर नोलनचा (Christopher Nolan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टेनेट’ (Tenet) ची भारतीय प्रेक्षकांना आतुरतेने वाट होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपत आहे. कारण भारतात या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केले आहे.

ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिची आई आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डिंपल यांनी सांगितले आहे की ‘टेनेट’ हा चित्रपट ४ डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे. या व्हिडिओमध्ये डिंपल म्हणतात, ‘आता प्रतीक्षा संपली आहे. क्रिस्टोफर नोलनचा ‘टेनेट’ ४ डिसेंबर रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित होत असल्याची घोषणा करून मला आनंद झाला. या प्रकल्पाशी संबंधित राहणे माझ्यासाठी सन्मान आहे.

सांगण्यात येते की ६३ वर्षीय अभिनेत्री डिंपल कपाडिया देखील या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये (Hollywood) पदार्पण करीत आहे. या चित्रपटात जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, रॉबर्ट पेटिनसन, मायकेल केन, हिमेश पटेल, एलिझाबेथ डेबिकी यांच्यासमवेत डिंपल देखील दिसणार आहे.

विशेष म्हणजे ‘टेनेट’ हा चित्रपट पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यात युनायटेड किंगडममध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर हा चित्रपट जवळपास जगभरात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला जगभरातून बरीच प्रशंसा मिळाली असून महामारीच्या या काळात कमाईही चांगली झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER