ख्रिस्टोफर नोलन यांनी केली डिंपलची प्रशंसा

Christopher Nolan praises Dimple

हॉलिवुडमधील प्रख्यात दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) यांनी त्यांच्या ‘टेनेट’ (Tenet) चित्रपटात भारतीय अभिनेत्री डिंपलला (Dimple) एक महत्वाची भूमिका साकारण्यास दिली होती. डिंपलने ती भूमिका खूपच चांगल्या पद्धतीने साकारल्याने आनंदी झालेल्या ख्रिस्टोफर नोलन यांनी पत्र लिहून डिंपलची प्रशंसा केली आहे. स्वतः ख्रिस्टोफर नोलनने डिंपलला पत्र पाठवल्याने तिचा जावई अक्षयकुमारही प्रचंड आनंदी झाला असून त्याने डिंपलवर गर्व असलल्याचे म्हटले आहे.

ख्रिस्टोफर नोलन यांनीच लिहिलेल्या आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या सायंस फिक्सन असलेल्या ‘टेनेट’मध्ये डिंपलने प्रिया नावाच्या महिलेची भूमिका साकारली आहे. नोलन यांनी डिंपलला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, डिंपलसाठी माझ्याकडून खूप खूप प्रेम, सम्मान आणि प्रशंसा. मी काय बोलू? तुमच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी खूप आनंददायी होते. प्रियाची भूमिका तुम्ही ज्याप्रकारे साकारली आहे त्याची करावी तितकी प्रशंसा कमी आहे. कठिण परिश्रम आणि चांगल्या अभिनयाबद्दल धन्यवाद.

शुक्रवारीच टेनेट भारतात इंग्रजीसह हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेमध्ये प्रदर्शित झालेला आहे. दिग्दर्शकाने केलेल्या प्रशंसेने केवळ डिंपलच नाही तर तिचा जावई अभिनेता अक्षयकुमारही प्रचंड आनंदी झालेला आहे. त्याने ख्रिस्टोफर नोलन आणि डिंपल यांच्याफोटोसह नोलनने पाठवलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासोबतच त्याने डिंपलसाठी एक चांगला संदेशही लिहिलेला आहे. अक्षय पोस्टमध्ये म्हणतो, एक जावई होण्याच्या नात्याने मला या घटनेचा खूप गर्व आहे. माझ्यासाठी यापेक्षा आनंदाचा दुसरा क्षण असू शकत नाही. आई तुझ्यावर आम्हाला गर्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER