ख्रिसमस, न्यू इयरची सर्वत्र जय्यत तयारी

Christmas - New Year

पुणे : जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांचा (Jesus Christ) जन्म हा मानव जातीच्या कल्याणासाठी झाल्याचे मानले जाते. यामुळे येशू ख्रिस्तांच्या जन्माचा पवित्र दिवस घरोघरी नाताळ सण म्हणून साजरा करतात. हा सण साजरा करण्यासाठी लागणाऱ्या ख्रिसमस ट्री, सांताच्या विविध प्रकारच्या नाताळबरोबरच न्यू इयरचीही तयारी सुरू आहे. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. हॉटेल्समध्ये फॅमिली, फ्रेंडस् ग्रुपसाठी विविध आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

ख्रिसमस (Christmas) आणि न्यू इयरच्या (New Year) सर्वत्र जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करून विविध उपाययोजनांसह ही तयारी करण्यात आली आहे. ख्रिसमसला २५ डिसेंबर पासून सुरूवात होत आहे, तर आगामी २०२१ या नववर्षाचे स्वागत आणि २०२० या गतवर्षाला निरोप देण्यासाठी २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे. राज्यभरातील सर्व मॉल्ससह बाजारपेठेत खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे.

प्रतिकृती, सांताची वेशभूषा, टोपी, विविध प्रकारचे केक, चॉकलेटस् व विविध प्रकारच्या भेटवस्तू यांच्यासह मदर मेरी, बेल्स, प्रभू येशू यांच्या मूर्ती, ग्रीटिंग कार्डस्, सजावटीचे साहित्य यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान, नाताळसाठी शहरातील विविध चर्च सजले आहेत. स्वच्छता, रंगरंगोटी वविद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. कोरोनाच्या (Corona) पाश्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सर्व चर्चमध्ये प्रार्थनेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्कसह गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र हॉलमध्ये स्क्रीनची व्यवस्था केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER