नाताळसाठी गोमंतकीय सज्ज

Christmas

‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे’, असे म्हणत नाताळ सण (Christmas) साजरा करण्यासाठी गोवा सज्ज झाला आहे, पणजीसह राज्यातील विविध बाजारपेठा नाताळ सजावटीच्या साहित्यासह तसेच ख्रिसमस स्पेशल बेबिंका, धोदेल, करंजा, सेरेदोरा, सान्ना आदी खाद्यपदार्थांचीही खरेदी केली जात आहे.

नाताळनिमित्त चर्च तसेच ख्रिस्ती बांधवांनी घरांना विद्युतरोषणाई करून येशु ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे उभारले आहेत. हे देखावे पर्यटक तसेच स्थानिकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय मोठ्या शोरूम तसेच काही आस्थापनांनी स्नोमॅन, सांताक्लॉज ठिकठिकाणी साकारले येशू ख्रिस्त जन्म देखावे यांच्या प्रतिमांचे ग्लास पेंटिंग केले आहे. पणजीसह राज्यातील विविध चर्चमध्ये काल गुरुवारी रात्री ठीक १२ वाजता मुख्य प्रार्थना आयोजित केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER