ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू

Chris Morris

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस मॉरिस (Chris Morris) याने आपल्या खेळाने नाही तर आपल्यासाठी मिळवलेल्या प्रचंड किमतीने क्रिकेट जगतात इतिहास घडवला आहे. त्याला चक्क १६ कोटी २५ लाखांची किंमत मिळाली असून एवढी गलेलठ्ठ रक्कम मोजून राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या तंबूत घेतले आहे. ख्रिस मॉरिसची बेस प्राईस ७५ लाख होती. आयपीएल २०२१ साठी (IPL 2021) चेन्नईतील गुरुवारी पार पडलेल्या लिलावात हा विक्रम घडला.

ग्लेन मॅक्सवेलसाठी (Glenn Maxwell) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (Royal Challengers Bangalore) १४.२५ कोटींची विजयी बोली लावली तर अलीकडेच चेन्नईतील दुसरी कसोटी गाजवलेल्या इंग्लंडच्या मोईन अलीला (Moeen Ali) सीएसकेने ७ कोटी मोजून आपल्याकडे घेतले.

झे रिचर्डसनसाठी (Jhye Richardson) जबरदस्त चुरस दिसून आली. त्याची बेस प्राईस दीड कोटी असताना त्याच्यासाठी बोली १० कोटींच्याही वर गेली. दिल्ली कॅपिटल्सही (Delhi Capitals) त्याच्यासाठी प्रयत्नात होते; पण टाईट बजेटमुळे त्यांनी ७.२५ कोटींनंतर प्रयत्न सोडून दिले.

मुस्तफीझूर रहमान (Mustafizur Rahman) हा एक कोटीच्या बेस प्राईसवर राजस्थान रॉयल्सकडे (Rajasthan Royals) आला. न्यूझीलंडच्या अॕडम मिल्नेसाठी मुंबई इंडियन्सने ३ कोटी २० लाख मोजले. दाविड मालन हा दीड कोटीच्या बेस प्राईसवर किंग्ज पंजाबच्या संघात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER