ख्रिस गेलच्या केवळ षटकार-चौकारांतूनच १० हजार धावा !

Chris Gayel

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे आहेत की, जे खेळले आणि विक्रम झाला नाही असे होणार नाही. असाच एक खेळाडू आहे युनिव्हर्स बाॕस ख्रिस गेल. बहुप्रतीक्षेनंतर गुरुवारी तो रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध खेळला आणि ४५ चेंडूंत एक चौकार व पाच षटकारांसह त्याने ५३ धावा केल्या.

या दरम्यान त्याने एक अद्भुत विक्रम केला, जो वाचून तुम्ही थक्क व्हाल. या गड्याने टी-२० क्रिकेटमध्ये आता निव्वळ चौकार- षटकारांतूनच १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत आणि अशा १० हजार धावा करणारा तो एकमेव आहे. युनिव्हर्स बाॕसचे आता १०२७ चौकार व ९८२ षटकार आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे आणखी दोन फलंदाज आहेत. वेस्ट इंडिजचाच किरोन पोलार्ड व शोएब मलिक हे ते दोघं आहेत; पण यांच्या एकूण धावा आहेत. गेलच्या मात्र षटकार व चौकारांतूनच १० हजार धावा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER