ख्रिस गेल म्हणतो, मला जे काम दिले ते मी केले!

Chris Gayle.jpg

टी-२० क्रिकेटचा (T-20 Cricket) बेताज बादशहा ख्रिस गेल (Chris Gayle) याला किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) खेळवणार की नाही? खेळवले तर तो कोणत्या क्रमांकावर खेळेल? या प्रश्नांची उत्तरे गुरुवारी मिळाली. किंग्ज इलेव्हनने अखेर त्याला रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध खेळवले. ‘युनिव्हर्स बॉस’ (Universe Boss) तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि ४५ चेंडूंत एक चौकार व पाच षटकारांसह ५३ धावा करताना त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली. आयपीएल २०२० मध्ये सर्वांत सफल सलामी जोडी किंग्ज इलेव्हनची राहिली आहे. के. एल. राहुल व मयंक अगरवाल सातत्याने धावा करत आहेत. चांगली सलामी देत आहेत.

दोघांच्याही तिनशेवर धावा यंदा झाल्या असून रॉयल चॅलेंजर्सविरुद्धसुद्धा त्यांनी ७८ धावांची सलामी दिली. म्हणूनच युनिव्हर्स बॉस सहसा सलामीलाच खेळत असला, ३९७ पैकी ३८८ डावांत तो सलामीलाच खेळला असला तरी किंग्ज इलेव्हनने त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले. केवळ सहाव्यांदा तो वन डाऊन खेळला; पण त्याबद्दल ख्रिस गेलला कोणतीही आपत्ती नाही. तो म्हणतो, मी आणि नर्व्हस ? अजिबात नाही. कम ॕन…युनिव्हर्स बॉस नर्व्हस कसा होऊ शकतो… खेळपट्टी खूपच संथ होती. चेंडू जणू तिला चिकटूनच येतोय असे वाटत होते.

पण नंतर फलंदाजी करणारांना तरी बरी स्थिती होती. संघाने मला तिसऱ्या स्थानी फलंदाजीला जायला सांगितले आणि त्यात मला काहीच अडचण नव्हती. या स्पर्धेत आमचे सलामी फलंदाज सलग चांगले खेळताहेत. म्हणून ती जमलेली जोडी आम्हाला बिघडवायची नव्हती. त्यामुळे मला जे काम दिले ते मी केले. आपल्या ४०५ टी-२० सामन्यांमध्ये गेल केवळ सहाव्यांदा तिसऱ्या स्थानी खेळला तर ३८८ वेळा सलामीला आला आहे. चौथ्या, पाचव्या आणि सातव्या क्रमांकावर तो फक्त एकदाच खेळलाय.

ही बातमी पण वाचा : IPL 2020: जेव्हा क्रिस गेलला विचारले गेले ‘तू नर्वस होता?’ त्याने दिले असे उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER