ख्रिस गेल आता सर्वाधिक शून्यांचाही ‘धनी’

Maharashtra Today

वेस्ट इंडिजचा (West Indies) ‘युनिव्हर्स बॉस’ (Universe Boss) अर्थात ख्रिस गेल (Chris Gayle) हा खऱ्या अर्थाने बॉस आहे. टी-20 क्रिकेटमधील फलंदाजीचे जवळपास सर्वच विक्रम त्याच्या नावावर आहेत. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकं, सर्वाधिक अर्धशतकंं, चौकार, षटकार, सर्वोच्च धावसंख्या, जलद शतक, जलद अर्धशतक या विक्रमांचा तो धनी होताच आणि आता एक विक्रम त्याच्या नावावर नव्हता. सर्वाधिक शून्यांचा (Zeroes) …तोसुध्दा आता त्याच्या नावावर लागला आहे.

आयपीएलमध्ये सोमवारी तो केकेआयविरुध्दच्या सामन्यात शून्यावर बाद झाला. हे टी-20 क्रिकेटमधील (आंतरराष्ट्रीय व इतर स्पर्धा मिळून) त्याचे 29 वे शून्य ठरले आणि यासह शून्याच्या बाबतीत त्याने आपलाच वेस्ट इंडियन सहकारी ड्वेन स्मिथ याला मागे टाकले. स्मिथच्या नावावर 28 शून्य आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्य (सामने)

ख्रिस गेल – 29 (422)
ड्वेन स्मिथ- 28 (337)
उमर अकमल- 27 (260)
शाहिद आफ्रिदी- 27 (326)
सुनील नरीन – 26 (354)
कामरान अकमल- 26 (270)
लेंडल सिमन्स- 26 (263)
रशिद खान- 25 (257)

भारतीय खेळाडूंमध्ये पियुष चावलाच्या नावावर सर्वाधिक टी-20 क्रिकेटचे शून्य आहेत. 249 सामन्यात तो 20 वेळा शून्यावर बाद झाला आहे. रोहित शर्माच्याही नावावर 20 शून्य आहेत पण ते 348 सामन्यांतील आहेत.

ख्रिस गेल हा टी-20 चे सामने जगभरातील 27 संघांसाठी 422 सामने खेळला असून त्याने 13 हजार 839 धावा केल्या आहेत.यात त्याचे 22 शतकं आणि 26 अर्धशतकं असून नाबाद 175 धावांची त्याची सर्वोच्च खेळी आहे. 1066 चौकार आणि 1014 षटकार आहेत. त्याची 175 धावांची सर्वोच्च खेळी ज्याप्रमाणे विजयासाठी आहे त्याचप्रकारे टी-20 पराभवातील सर्वोच्च खेळीसुध्दा त्याच्या नावावर आहे. सॉमरसेटसाठी केंटविरुध्द त्याने केलेल्या नाबाद 151 धावा पराभवात होत्या.

धावांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावरील किरोन पोलार्डपेक्षा तो तीन हजाराच्यावर धावांनी पुढे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button