चित्रपटनगरी कोणाचे पॉकेट नाही, बॉलिवूड मुंबईतच राहिल; योगींची ग्वाही

CM Yogi Adityanath

मुंबई :- मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज याची अधिकृत घोषणा केली. सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर योगींनी ही घोषणा केली. यावेळी ठाकरे सरकार आणि शिवसेनेकडून झालेल्या टीकेवरही योगींनी उत्तर दिलं. आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, चित्रपटनगरी कोणाचे पॉकेट नाही, की उचललंआणि घेऊन गेले. बॉलिवूड (Bollywood) मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना योगी आदित्यनाथ यांनी ही ग्वाही दिली. कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. मुंबई फिल्मसिटी आपलं काम करेल. यूपीतील नवी फिल्मसिटी त्यांचं काम करेल, असंही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं. बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही. भारताची इकनॉमी आर्थिक स्थिती वाढवायची आहे. हेच सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, असा चिमटाही त्यांनी शिवसेनेला काढला.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही ;  शिवसेना नेत्याचे वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER