गव्हाळ रंगामुळे चित्रांगदा सिंहलाही वर्णभेदाला सामोरे जावे लागले होते

chitrangada singh

बॉलीवूड मध्ये नायिका ह्या गोऱ्या रंगाच्या असाव्यात याकडे निर्माता-दिग्दर्शक नायक या सगळ्यांचा आग्रह असतो. सावळ्या रंगाच्या नायिकांना शक्यतो पसंती दिली जात नाही. परंतु बॉलिवूडमध्ये सावळ्या रंगाच्या अनेक नायिकांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यात काजोलपासून बिपाशा बसुपर्यंत अनेकींची नावे घेता येतील. यात चित्रांगदा सिंहही मोडते. सावळ्या वर्णामुळे चित्रांगदा सिंहला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. स्वतः चित्रांगदाने ही माहिती एका मुलाखतीत दिली आहे.

चित्रांगदा सिंह म्हणते, उत्तर भारतात सावळ्या रंगामुळे मला अनेकदा अपमान सहन करावा लागला होता. या रंगामुळे मॉडेलिंगच्या अनेक असाइनमेंट माझ्या हातून काढून घेण्यात आल्या होत्या. केवळ लहानपणीच नव्हे तर मोठी झाल्यावरही मॉडेलिंग करतानाही या रंगामुळे माझ्यावर शेरेबाजी केली जात असे, असेही तिने म्हटले आहे. मात्र स्वतःच्या गव्हाळ रंगावर मी आनंदी आहे अशी पोस्ट गेल्या महिन्यात तिने इंस्टाग्रामवर टाकली होती.

या मुलाखती दरम्यान चित्रांगदाने म्हटले, अनेकदा तुमच्या त्वचेचा रंग पाहून तुम्हाला काम दिले जाते. गोरा रंग असेल तर लगेच काम मिळते. मात्र याचा अर्थ असा नाही कि, सगळेच असे वागतात. काही निर्माते, दिग्दर्शक रंगापेक्षा अभिनयाला प्राधान्य देतात. खरेतर सगळ्यांनीच असे वागले पाहिजे. एक मुलगी म्हणून गव्हाळ रंगासोबत जगताना काय अडचणी येतात हे मला चांगले ठाऊक आहे. अनेक लोक तुम्हाला तोंडावर काही बोलणार नाहीत, परंतु मागे तुम्हाला नावे ठेवतात.

त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनातले भाव कळतात. करिअरच्या सुरुवातीच्या काळात माझ्या रंगामुळेच मला मॉडेलिंगच्या असाइन्मेंट नाकारण्यात आल्या. तेव्हा मला स्पष्टपणे सांगण्यातही आले होते की, मी सावळी असल्याने मला मॉडेलिंग करता येणार नाही. परंतु गुलजार साहेबांनी माझी ऑडिशन पाहिली आणि त्यांच्या म्युझिक व्हिडिओ मध्ये मला सर्व प्रथम संधी दिली. तेव्हा मला जाणवले की, येथे फक्त गोरा रंग पाहिला जातो असे नाही. चित्रांगदा आता लवकरच एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसणारं असून विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्मची पटकथा आणि संवादही तिनेच लिहिलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER