चित्रा वाघ यांचे आव्हान, आता तरी धाडस दाखवा

Uddhav Thackeray - Chitra Wagh

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांनी वाझेंना १०० कोटी रुपये ‘वसूल करण्याचे टार्गेट’ दिले होते असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्र्याना कारवाई करण्याचे आव्हान देताना म्हटले की, महाराष्ट्राच्या जनतेला कोण लुबाडते हे माहीत झाले पाहिजे आता मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावे.

चित्रा वाघ म्हणाल्यात की, मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री ठाकरे (CM Thackeray)यांच्याकडे लेखी स्वरुपात अतिशय खळबळजनक आरोप केले आहेत. पोलिस अधिकारी वाझे यांना १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सागितले गेले होते असे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून जर कुंपणच शेत खात असेल तर जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, असा असा प्रश्न वाघ यांनी केला आहे.

ओ बाब्बो…लो कर लो बात….अब बात निकलही गई है तो फिर दूर तलक जायेगी..अशा आशयाचे ट्विट करत वाघ यांनी यामध्ये अनेकजण सामील असण्याची शक्यता व्यक्त करत या सर्वांचा तपास झाला पाहिजे असे म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचे संकेत 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER