संजय राठोड हत्यारा ; स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड ; चित्रा वाघ यांचा घणाघात

Sanjay Rathore-pooja-chavan-suicide-case-chitra-wagh

मुंबई : स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आला आहे. मात्र संजय राठोड (Sanjay Rathod) हा पूजा चव्हाणचा हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी केला.

राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. जवळपास 15 दिवसांनी ते समोर आले. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. यानंतर वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला .

गुन्हेगाराला जात-पात नसते. महाविकास आघाडीचे नेते म्हणत होते संजय राठोड आमच्या संपर्कात आहे. मात्र संजय राठोडांनी मंत्र्यांशी संपर्क करण्याऐवजी पोलिसांशी संपर्का का केला नाही? असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.

मी निर्दोष आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड यांनी केला. संजय राठोड त्यांनी केलेल्या पापाची कबुली करण्यासाठी ते बंजारा समाजाच्या काशीमध्ये गेले. समाजाला एकत्रित करुन घोषणाबाजी केली गेली. दोन फरार मुलांपैकी एका मुलाचा सुगावा लागला. संजय राठोडांचा शहाणपणा गेले पंधरा दिवस कुठे होता. दोन पैकी एक मुलगा फरार आहे. एक मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्या मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळायला हव्या, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

राज्य सरकारचे मंत्री बलात्काऱ्यांना पाठिशी घालतात, हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, असे टीकास्त्र चित्रा वाघ सोडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER