मिटकरी भावा, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार : चित्रा वाघ

Amol Mitkari-Chitra Wagh

मुंबई : सिंहाच्या तालमीतील वाघ केवळ नावापुरते उरले आहेत, अशी टीका करणारे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सडेतोड उत्तर दिले . मिटकरी भावा, माझे आणि ‘माझ्या बापा’चे अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार, असे वाघ यांनी सुनावले.

अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर.

चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान “वाघाची” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…” असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER