…आता मनसुख हिरेन, निष्पक्ष चौकशी होईल ना?; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला टोमणा

Uddhav Thackeray-Chitra Wagh

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर उघड होत असलेल्या गोष्टींमुळे हे प्रकरणही रहस्यमय होते आहे. यावरून, पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरण लावून धरणाऱ्या भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे (Thackeray Govt.) यांना टोमणा मारला – निष्पक्ष चौकशी होईल ना?

चित्रा वाघ यांनी ट्विट केले – महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?

या ट्विटमध्ये सेलीब्रीटी म्हणजे अभिनेता सुशांत राजपूत, एखादी मुलगी पूजा चव्हाण यांच्या रहस्यमय मृत्यूचा संदर्भ आहे. मनसुख हिरेन यांचे शव काल मुंब्रातील रेतीबंदर परिसरात आढळले आहे. हिरेन यांची चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : संजय राठोड अजूनही मंत्री! राजीनामा धूळफेक; चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले

वझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय बळावतो

“सचिन वझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असे असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरे असल्याचे पुन्हा गडद होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी,” अशी मागणी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आधीच सरकारकडे केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER