‘क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी !’ चित्रा वाघ यांचा सवाल

मुंबई : राज्य सरकारने चंद्रपूरची दारूबंदी (liquor-ban-lifting) उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले. यासोबतच वाघ यांनी पाटील यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. यवतमाळमधील दारूबंदीचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी ! असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी पाटील यांना केला आहे. वाघ यांनी ट्विट करून जयंत पाटील यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सोबत त्यांनी विधानसभेतील जयंत पाटलांच्या भाषणाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

क्या हुवा तेरा वादा… जयंतरावजी! सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार…..इस आश्वासन का, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. यवतमाळ राहिले दूर. चंद्रपूरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने. महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असंच खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button