पर्यटन फोटोसेशन तीन तासांत शक्य नाही म्हणून रद्द केले; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Chitra Wagh

मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला (Ratnagiri and Sindhudurg tour) तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) सर्वाधिक तडाखा बसला आहे. या चक्रीवादळात झालेल्या नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करतात, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी या भागाचा दौरा करत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटले. मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. ‘चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलेलो नाही. ’ मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या की, “देवेंद्रजी… काय राव तुम्ही, थेट दुष्काळी भागात लोकांच्या मदतीला पोहचता. मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावे लागते ना… ३ तासांच्या कोकण दौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या, किती सांत्वन केलं, हे सगळे कृपा करून विचारू नका… आणि हो पर्यटन फोटोसेशन ३ तासांत शक्य नाही म्हणून रद्द केलं आहे.” असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button