….तर चित्रा वाघ असं नाव सांगणार नाही : चित्रा वाघ

Chitra Wagh

मुंबई : “आज माझे फोटो मॉर्फ केले गेले. मला फोन येत आहेत. कापून टाकू, मारून टाकू, अशा धमक्या (Threats call) येत आहेत. आज तर माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला. माझे कुठेही कारखाने नाहीत. या गुन्ह्याबद्दल कसलीही चिठ्ठी आली नाही. मला या गुन्ह्याबद्दल अजूनही माहीत नाही. पोलिसांनी व्हॉट्सअ‌ॅपवर नोटीस पाठवली. त्यांना एवढी घाई झाली का?” अशी टीका भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.

ही बातमी पण वाचा:- चित्रा वाघ यांच्या पतीवर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल

मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून (Pooja Chavan Case) सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांच्या पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

“मला फोन येत आहेत. त्यात कापून टाकू, मारून टाकू, अशा धमक्या येत आहेत. माझ्या नवऱ्याने एकही रुपया घेतला नाही. जनतेला हे समजायला पाहिजे. या प्रकरणात ज्याने पैसै घेतले, त्याची अजूनही चौकशी सुरू आहे. मात्र, माझे पती किशोर वाघ हे तिथे उपस्थितच नव्हते, त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला गेला.” असा आरोप यावेळी त्यांनी केला.

त्रास देऊन दबाव टाकला जात आहे

पुढे त्या म्हणाल्या की, “माझ्या नवऱ्याला त्रास दिला जात आहे. आम्ही आमच्या संपत्तीचा सगळा हिशोब दिला आहे. विरोधकांना मला गुंतवायचे आहे. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. माझ्या नवऱ्याला मानसिक त्रास दिला जात आहे. छळलं जात आहे. तसेच “त्यांनी गुन्हा दाखल केला, तर काहीही फरक पडत नाही. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायव्यवस्था या सरकारसारखी मुर्दाड नाही.” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

सगळ्यांना मीच पुरून उरणार

“पोलिसांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी डगमगणार नाही. राज्यात एका मुलीचा खून झाला. तिला मारून टाकण्यात आले. मी याबद्दल बोलले म्हणून माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्हाला वाटले मी शांत बसेल, पण तुम्हा सर्वांना मीच पुरून उरणार आहे आणि तसे झाले नाही तर चित्रा वाघ नाव सांगणार नाही.” असेदेखील चित्रा वाघ म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER