मंत्र्याच्या आदेशावरून राठोडप्रकरणातील ऑडिओ क्लिप्सशी छेडछाड; चित्रा वाघ यांचा आरोप

मुंबई :  पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आले होते. त्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. या प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ऑडिओ क्लिप्सशी (audio clip) छेडछाड केली जात आहे, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कुठल्या मंत्र्याच्या किंवा व्यक्तीच्या आदेशावरून या ऑडिओ क्लिप्सशी छेडछाड केली जात आहे? सरकार संजय राठोड यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा संशय आम्हाला आहे.

तेव्हा सरकारने कुठलीही हेराफेरी न करता सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. दरम्यान, यापूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राठोड आणि मनसुख हिरेन प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केली जात असल्याचा आरोप केला होता. संजय राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लिप्स सांताक्रुझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच, असा अहवाल तयार करण्यासाठी या क्लिप्समध्ये पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER