‘विशाखा क़ायदा’ राज्याच्या वनमंत्रालयाला लागू आहे की नाही : चित्रा वाघ

मुंबई :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan Sucide Case) हिच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी आता ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दिपाली चव्हाण यांना अपमानित करण्यात आले. भ्रष्ट व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला, असा हल्लाबोल भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.

“Sexual Harresment at work place हा ‘विशाखा क़ायदा’ राज्याच्या वनमंत्रालयाला लागू आहे की नाही. RFO दिपाली चव्हाण हिने DCF शिवकुमार विरोधात केलेली तक्रार वनसंरक्षक रेड्डी यांनी विशाखातंर्गत ICC कमिटीत का दाखल करून घेतली नाही. क़ायदे फक्त कागदावरच ठेवायचे असतील, तर काडी लावा त्यांना…” असे चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे.

“लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. त्यांना त्रास देण्यात आला, ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला, तिला अपमानित केले.” असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. DCF शिवकुमारविरुद्धच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर दीपाली वाचली असती. ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.दीपालीच्या पत्रात गंभीर आरोप

ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करू शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.

रात्री बेरात्री भेटायला बोलवायचे. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहीत होते. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे, जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो, पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

माझ्या रेंजमधील सर्व काम करूनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरून कामावर रुजू होत नव्हते, पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल, असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत गेला, असे दीपाली चव्हाण हिने पत्रात म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून हत्या, मानसिक छळ करणारा अधिकारी ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER