राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा; अजूनही अटक का नाही? चित्रा वाघ यांचा सवाल

मुंबई :- भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा  युवक अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. या पद्धतीच्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात येते. औरंगाबाद पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. सर्वसाधारण आरोपी असता तर त्या आरोपीला अटक केली असती, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का? हा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना विचारला आहे. ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर कॅम्पेन राबवण्यात येत आहे. पीडित आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. औरंगाबाद पोलिसांनी आरोपी मेहबूब शेख याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER