खिसे गरम करायचे ‘गणित’ येते राजीनाम्याच्या आड; चित्रा वाघ यांची यशोमती ठाकुरांवर टीका

मुंबई : पोलिसांना मारहाण केलेल्या आरोपात महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना कोर्टाने तीन महिने तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर भाजपकडून ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. या संदर्भात भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकूर यांना टोमणा मारला आहे – खिसे गरम करायचे ‘रहस्य’ राजीनाम्याच्या आड येते आहे.

वाघ म्हणाल्या, ‘गाडी का अडवली म्हणून पोलिसांना मारहाण करणाऱ्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. नैतिक जबाबदारी म्हणून मागणी करायच्या आधीच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता; पण खिसे गरम करायचे ‘गणित’ तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल? यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, महाविकास आघाडीचे सरकार नुकतेच सत्तेवर आल्यानंतर यशोमती ठाकूर यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर काही दिवसांत झालेल्या कार्यक्रमात त्या म्हणाल्या होत्या, आम्ही नुकतेच मंत्री झालो आहोत; अजून आमचे ‘खिसे गरम’ झालेले नाहीत. यशोमती ठाकूर यांच्या त्याच – अजून आमचे ‘खिसे गरम’ झालेले नाहीत. या वक्त्यव्यावरून चित्रा वाघ यांनी त्यांना टोमणा मारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER