पूजाच्या वडिलांची प्रतिक्रिया अतिशय दुर्दैवी, तो आवाज संजय राठोड यांचाच; चित्रा वाघ आक्रमक

Chitra Wagh - Sanjay Rathod - Pooja Chavan

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणावारून वडिलांनी दिलेले स्टेटमेंट हे अतिशय दुर्दैवी आहे, असे म्हणत भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर पूजाचे वडील लहू चव्हाण (Lahu Chavan) यांनी काल (14 फेब्रुवारी) प्रथमच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्हाला बदनाम करु नका. तिला कर्जाचे टेन्शन आले असावे, असे वक्तव्य केले. याच वक्तव्यावर, तसेच पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना चित्रा वाघ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे .

पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिलेले स्टेटमेंट हे अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात जी मुलं साक्षीदार होती त्यांना सुरुवातीला सोडण्यात आलं. आता त्यांचा शोध घेतला जातोय, असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, गृहराज्यमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे संरक्षण करतायत का?, असा खोचक सवालही वाघ यांनी सरकारला केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER