
रत्नागिरी : संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी भारतीय जनता पार्टी चिपळूण कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काळे वस्र परिधान करून भाजपा तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा जाहिर निषेध केला. यावेळी निषेध फलके दाखवून घोषणाबाजी करत करण्यात आली. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष .विनोद भोबस्कर, महिला तालुकाध्यक्षा सौ.प्रतिज्ञा कांबळी, तालुका उपाध्यक्ष संदीप सुखदरे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष गणेश नलावडे, माजी शहराध्यक्षा सौ.वैशाली निमकर, भाजपा पदाधिकारी मधुकर निमकर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस कु. मंदार कदम, युवा मोर्चा शहराध्यक्ष साहिल रानडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला