सांगली : वटवृक्षाच्या संवर्धनासाठी चिपको आंदोलन

Chipko Movement

सांगली : सुमारे चारशे वर्षाच्या वृक्षाला वाचवण्यासाठी सांगलीत चिपको आंदोलन(Chipko Movement) उभा राहत आहे.मिरज-पंढरपूर मार्गावरील भोसे नजीक महामार्गाच्या रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने वटवृक्षाची कत्तल करण्यात येत आहे. या महाकाय वडाच्या झाडाच्या संवर्धनासाठी चिपको आंदोलन करत चळवळ सुरू केली आहे.

सांगली(Sangli) जिल्ह्यातुन जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.या रस्ते कामासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. मात्र मिरज – पंढरपूर मार्गावरील असणाऱ्या एका झाडाच्या कत्तलीवरून आता आंदोलन सुरू झाले आहे.भोसे नजीक असणाऱ्या यल्लमा देवीच्या मंदिरासमोरील विस्तीर्ण असा वटवृक्ष तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.मात्र सांगलीतील वृक्ष प्रेमींनी याला विरोध केला आहे.झाडाची कत्तल करण्याऐवजी त्याच्या बाजूने रस्ता काढणे हा पर्याय आहे , त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत झाड तोडू देणार नाही,यासाठी प्रसंगी तीव्र जन आंदोलन छेडु,असा इशारा वृक्ष प्रेमींनी दिला आहे.

वारकरयांच्या विसाव्याचे ठिकाण..
मिरज-पंढरपूर मार्गावरील हे भले मोठे वडाचे झाड असून या झाडाने अनेकांना सावली देण्याचे काम केले आहे.त्याच बरोबर वर्षानुवर्षे या झाडाच्या मार्गावरून पंढरपूरच्या वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यासाठी हक्काचे सावली देणारे हे झाड आहे. याठिकाणी असणाऱ्या मंदिराबरोबर हे झाड वारकऱ्यांना ऊन पाऊस यापासून नेहमी रक्षण करत आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे प्रत्यके वारकरी या झाडयाच्या आश्रयाला असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER