चायनीस कोरोनावर पुण्याची मात, भारतातील पहिली लस पुण्यात विकसित!

Coronavirus Vaccine

पुणे : चीनसह जगभरात धुमाकूळ माजवणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित करण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने, अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं ही लस विकसित केली आहे. वैद्यकीय चाचणीसाठी ही लस प्राथमिक स्तरावर उपलब्ध करण्यात आली असून, सहा महिन्यांनतर रुग्णावर या लसीची चाचणी केली जाणार आहे.

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार आहे, असा दावा संस्थेच्या वतीनं करण्यात आला आहे. या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे कोरोनाचं संक्रमण रोखता येऊ शकेल. ही भारतातील पहिली लस असेल, जी इतक्या कमी वेळात या स्तरापर्यंत आणण्यात यश मिळालं आहे, असं सीरम इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे.

या लसीच्या मानवी चाचणीनंतर तिला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतर तिचा प्रत्यक्ष वापराला सुरुवात केली जाऊ शकते, असंहीस्पष्टीकरण संस्थेने दिल आहे.