चीनी बँका अनिल अंबानींची संपत्ती जप्त करून करणार कर्जवसुली

Anil Ambani

कर्जात बुडालेले उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची परदेशातील संपत्ती जप्त थकबाकी वसूल करण्याची तयारी चीनच्या तीन बँकांनी केली आहे. या बँकांनी अनिल अंबानींच्या कंपन्यांना सुमारे ५,२७६ कोटी रुपये कर्ज दिले आहे.

इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चाइना, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चाइना आणि चाइना डेव्हलपमेंट बँकेने अधिकारांचा वापर करत अंबानी यांच्याकडील कर्जवसूल करण्याचा निर्णय घेतला आहे, याअंतर्गत अंबानी यांची संपत्ती बँका ताब्यात घेतील.

ब्रिटनमध्ये सुनावणी दरम्यान अनिल अंबानी कथितरित्या म्हणाले होते की, त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही व ते दागिने विकून न्यायालयीन खर्च भागवत आहे.

चीनी बँकांचे वकील थांकी क्यूसी ब्रिटनच्या न्यायालयात म्हणाले की, अनिल अंबानी बँकांना एकही रुपया न देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. बँकांनी त्यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ब्रिटनच्या न्यायालयाने याआधी २२ मे रोजी अंबानींना चीनी बँकांचे ५,२७६ कोटी रुपये आणि ७. ०४ कोटी रुपये न्यायालयीन खर्च म्हणून देण्यास सांगितले होते. व्याज जोडून ही रक्कम जूनपर्यंत ५२८१ कोटी रुपयांवर गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER