एकनाथ शिंदेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणा-या छिंदमचे नगरसेवक पद रद्द

Ekenath Shinde-Chidam

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य करणारे अहमदाबाद महापालिकेचे तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाने प्रसिद्ध केले आहे.

छिंदम यांच्या या अवमानकारक वक्तव्याबद्दल अहमदनगर महापालिकेने 26 फेब्रुवारी 2018 रोजी विशेष सभा घेऊन नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या मंजुरीसाठी 9 मार्च 2018 रोजी सादर केला होता. हा अहवाल आणि महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमातील कलम 13(1) मधील तरतूदींनुसार छिंदम यांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. तत्कालीन नगरविकास राज्यमंभी यांच्याकडे 17 ऑक्टोबर 2018, 5 ऑगस्ट 2019 आणि 22 ऑगस्ट 2019 रोजी सुनावण्या झाल्यात. परंतू निर्णय मात्र झाला नाही.

शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला ‘ठाकरे’ सरकारचा दणका; नगरसेवकपद रद्द

गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहाण्यास नकार दर्शवत छिंदम यांनी यापूर्वी सादर केलेले म्हणणे ग्राह्य धरण्याची विनंती केली होती. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा ठराव, आयुक्तांनी वेळोवेळी सादर केलेले अहवाल आणि आजवर अवलंब केलेल्या प्रक्रियेचा विचार करून छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले.