चीनचे सुखोई-३५ पडले; तैवानने पाडल्याचा संशय

China's Sukhoi-35 fell

नवी दिल्ली : तैवानमध्ये आज चीनचे सुखोई-३५ फायटर जेट पडले. तैवान आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीत तैवानने अमेरिकेची पेट्रियाट मिसाइल डिफेन्स सिस्टीम वापरून हे विमान पाडले अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्या एका सूत्राने म्हटले आहे की, चीनने हे विमान तांत्रिक बिघाड झाल्याने पडल्याचे म्हटले आहे. अजून स्थिती स्पष्ट नाही. तैवान आणि चीनमध्ये काही काळापासून तणाव आहे.

तैवानने चीनला अनेकदा तैवानच्या हवाई सीमांचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतरही अनेकदा चिनी फायटर जेट्स तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत होती. आज तैवानने हवाई हद्दीचे उल्लंघन करणारे चिनी विमान पाडले अशी चर्चा आहे. विमानाचा पायलट जखमी झाल्याचे कळते. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

दरम्यान, मागील बऱ्याच काळापासून दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये चीनचे शेजारी देशांशी वाद सुरू आहेत. चीन आणि तैवानमध्येही तो आहे. तैवानमध्ये चीनचा विरोध वाढतो आहे. तैवानवर हक्क सांगणाऱ्या चीनला तैवानने अनेकदा इशारा दिल्यानंतरही त्याकडे चीन गांभीर्याने लक्ष देत नाही.

संघर्षाची ठिणगी?
तैवानने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अमेरिकेने आपल्या नौदलाला सज्ज राहण्याचा इशारा दिल्याचे वृत्त आहे. तैवानने खरोखरच हे जेट पाडले असेल तर ही चीन आणि तैवानमधील युद्धाची ठिणगी ठरू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

संघर्षाची ठिणगी?

तैवानने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अमेरिकने आपल्या नौदलाला सज्ज राहण्याचा इशारा दिल्याचे वृत्त आहे. तैवानने खरोखरच हे जेट पाडले असेल तर ही चीन आणि तैवानमधील युद्धाची ठिणगी ठरु शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER