मोदींना एवढे मोठे पाऊल उचलण्याची आवश्यकता नव्हती; मोदींच्या लडाख भेटीवर चीनची प्रतिक्रिया

लेह :- गेल्या काही दिवसांपासून भारत – चीन सिमेवर तणाव आहे. याच दरम्यान भारत – चीन सैन्यांत झटापट होऊन भारताचे 20 जवान शहीद झालेत. त्यानंतर भारत – चीन तणावावर दोन्ही देशांतील वरीष्ठ अधिकारी चर्चेचे वृत्त असतानाच पंतपधान नरेंद्र मोदी आज सुर्योदयापुर्वीच अचानक लडाखला पोहोचले. भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोदी लडाखमध्ये पोहोचले. अचानक केलेली त्यांची लडाख भेट कुरापतखोर चीनला एक संदेश आहे. हे चीनने जाणले व मोदींच्या लडाख भेटीवर प्रतिक्रिया देतांना चीनने नरमाईची भूमिका घेतली.

मोदींच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अगदी मवाळ भूमिका घेत, भारत आणि चीन या भागांमधील परिस्थिती मवाळ होण्यासंदर्भात पावले उचलत असल्याचा दाखला दिला. व कोणत्याही देशाने हा वाद अजून चिघळण्यासारखं पाऊल उचलू नये अशी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“भारत आणि चीन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. लष्करी तसेच राजकीय चर्चेच्या माध्यमातून या भागातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. अशावेळी कोणत्याही पक्षाने या प्रदेशामधील तणाव वाढणारं पाऊल उचलू नये,” असं मत चीनच्या परदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची भेट घेतली. निमू येथे तैनात असणाऱ्या लष्कराच्या जवनांबरोबरच हवाई दलाचे अधिकारी आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या जवानांशी मोदींनी संवाद साधला. भारत चीन सिमेवरील हिंसक तणावानंतर मोदींच्या अचानक ठरलेल्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER