कोरोना विषाणूच्या निर्मितीची चीनची योजना सहा वर्ष जुनी ?

नवी दिल्ली : वर्षभरापेक्षा अधिक काळापासून जगभरात कोरोनाचे (Corona virus) थैमान सुरू आहे. ही साथ येण्याचे कारण शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हा विषाणू अचानक २०२० मध्ये आला असे नाही. चीनमधील शास्रज्ञ २०१५ पासून ‘सार्स’ विषाणूच्या मदतीने जैविक अस्र तयार करण्याचा प्रयत्न करत होते. चीनच्या सैन्याने ६ वर्षांपूर्वीच कोविड-19 विषाणूला जैविक अस्र म्हणून वापरण्याची योजना तयार केली होती, असा दावा ऑस्ट्रेलियातील ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने केला आहे. चीनमधील (China) एका रिसर्च पेपरच्या आधारे हे वृत्त दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. भातातील एका वृत्तसमूहाच्या वेबसाईटवर हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीनुसार चीनी शास्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी २०१५ पासूनच कोविडच्या वेगवेगळ्या स्ट्रेनबाबत चर्चा करत होते. त्यावेळी चीनी शास्रज्ञ म्हणाले होते की, तिसरे महायुद्ध झाले तर त्यात जैविक अस्र म्हणून या विषाणूचा वापर करता येईल. तसेच गरज भासली तर या विषाणूच्या रचनेत बदल करून जगात रोगाची साथ परसवण्यासाठीही त्याचा उपयोग करता येईल. या शास्रज्ञांच्या चर्चेच्या हाती लागलेल्या पुराव्यांतून ही बाब आता उघड झाली आहे.

चौकशीबाबत चीनची माघार

चीनमधील या विषाणूबाबत चौकशी किंवा तपास करण्याची मागणी जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आली तेव्हा तेव्हा चीनने माघार घेतली, असे बातमीत म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट रॉबर्ट पॉटर म्हणाले, ‘ चीनने थेअरी मांडली होती की वटवाघुळांच्या मार्केटमधून कोरोना विषाणू जगभर परसरला पण ही थेअरी पूर्णपणे खोटी आहे. मी चिनी रिसर्च पेपर्सचा सखोल अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की तो रिसर्च पेपर अगदी बरोबर आहे. आम्ही सतत चिनी रिसर्च पेपरचा अभ्यास करतो त्यातून चिनी संशोधक काय विचार करत आहेत याचा अंदाज आम्हाला येतो.’

ट्रम्प यांचा दावा असू शकतो खरा

ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्राने केलेला हा दावा खोटा म्हणता येणार नाही कारण गेल्यावर्षी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे कोरोना विषाणूला चिनी व्हायरस म्हटले होते. हा विषाणू चिनी प्रयगोशाळांत तयार झाला असून त्यामुळे जगातील आरोयग क्षेत्राचे मोथे नुकसान झाले असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्या आहेत. अमेरिकी गुप्तचर संस्थांकडे चीनच्या व्हायरसचे पुरावे असून वेळ आल्यावर ते जगासमोर मांडले जातील असा दावा ट्रम्प यांनी केला होता.

ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाले पण सध्याचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सार्वजनिकपणे आपली भूमिका मांडलेली नाही. ब्लूमबर्गने काही दिवसांपूर्वी दिलेल्या बातमीत अमेरिका या विषयात अतिशय गंभीर आणि गतिमान चौकशी करत असल्याचे आहे त्यामुळे ट्रम्प यांचा दावा खरा असू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button