चीनच्या या निर्णयामुळे जगात निर्माण होणार औषधांचा तुटवडा

China

नवी दिल्ली :- कोरोनामुळे (Corona) चीनने मालवाहू विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जगात औषधांच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होण्याचा धोका आहे. यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताकडून औषधांची आयात करणाऱ्या देशांसमोरही समस्या निर्माण झाली आहे.

अमेरिका औषधांसाठी मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. भारताकडून औषधं आयात करणाऱ्या देशांची संख्या खूप मोठी आहे. मात्र आता चीनकडून (China) होणार कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने भारतातील औषध निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते. भारतात कोरोनाची साथ वाढल्यानंतर चीनने सरकारी विमान कंपनी ‘सिचुआन एअरलाईन्स’च्या मालवाहू विमानांची उड्डाण रोखली.

भारतीय औषध निर्मिती संघाचे अध्यक्ष महेश दोषी (Mahesh Doshi) यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. भारतात तयार होणाऱ्या औषधांसाठीचा ६० ते ७० टक्के कच्चा माल चीनहून येतो. त्यामुळे चीनने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम औषध उत्पादनांवर होऊ शकतो अशी भीती दोषी यांनी व्यक्त केली. यासंदर्भात दोषी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २९ एप्रिलला पत्र लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button