दसरा दिवाळीत चिनचा ४० हजार कोटींचा व्यवसाय बुडणार : कॅटची माहिती

CAIT

नवी दिल्ली : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने देशभरातील चीनी वस्तूंना पर्याय देत, दसरा-दिवाळी सणाच्या हंगामात सुमारे ४० हजार कोटींचा मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. कॅटच्या या मोहिमेला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंची विक्री न करण्याचे संकल्प केला आहे, तर ग्राहकही चिनी वस्तू विकत घेण्याच्या मानसिकेतमध्ये नाहीत.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी सणाच्या काळात दरवर्षी सुमारे ७० हजार कोटींचा व्यवसाय केला जातो. ज्यामध्ये सोन, चांदी, ऑटोमोबाईलसारख्या महागड्या किरकोळ व्यापाराचा समावेश आहे. मागील वर्षी चीनमधून सुमारे ४० हजार कोटी रुपयांची माल आयात केली होती. भारत-चिन सिमेवरील तणाव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले स्वदेशीचे आवाहन यामुळे चीनबद्दल भारतीयांमध्ये मोठा संताप आहे. चिनी वस्तूंना पर्याय म्हणून कॅटने देशभरातील लघुउद्योगांना अधिक उत्पादने वाढविण्यास प्रोत्साहित केले आहे. देशभरातील बाजारपेठेत देशी वस्तूं विक्रीसाठी कॅट मदत करणार आहे. भारतात कला आणि कौशल्याची कमतरता नाही, परंतु अशा लोकांना उत्पादनासाठी सहकार्य उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ करणे आवश्यक असल्याचे कॅटचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER