चीनचा विश्वविक्रम : कृत्रिम सूर्याच्या माध्यमातून केली १२० दशलक्ष डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

File photo
File photo

बीजिंग :- चिनी शास्त्रज्ञांनी शुक्रवारी एक प्रयोग करून विश्वविक्रम स्थापित केला आहे. शुक्रवारी झालेल्या ताज्या प्रयोगात १०१ सेकंदांत १२० दशलक्ष डिग्री सेल्सिअसमध्ये प्लाझ्मा तापमानाची निर्मिती केली आहे. चीनच्या कृत्रिम सूर्याला एचएल-२ एम असे नाव देण्यात आलेले आहे. हे चायना नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनने साऊथवेस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या सहकार्याने हा कृत्रिम सूर्य तयार करण्यात आला आहे. सिचुआन प्रांतातील लेशान येथे याला स्थापित केले गेले आहे. पूर्णतः सक्रिय असताना, हा कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १३ पटीने अधिक उष्ण असून जवळजवळ २०० दशलक्ष डिग्री सेल्सिअस तापमान तयार करण्यास सक्षम आहे. खरा सूर्य १५ दशलक्ष डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान तयार करू शकतो.

कृत्रिम सूर्याच्या कार्यप्रणालीत एका शक्तिशाली चुंबकीय क्षेत्राचा वापर केला जातो. या दरम्यान तो १५० मिलियन म्हणजे १५ कोटी डिग्री सेल्सिअसचे तापमान मिळवू शकतो. पीपल्स डेलीनुसार, हा खऱ्या सूर्याच्या तुलनेत दहापट जास्त उष्ण आहे. खऱ्या सूर्याचे तापमान सुमारे १५ कोटी डिग्री सेल्सिअस आहे. पृथ्वीवरील न्यूक्लियर रिअॅक्टर्सबाबत बोलायचे तर, येथे ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी विभाजन प्रक्रियेचा वापर होतो. हे तेव्हा होते, जेव्हा उष्णता अणूला विभाजित करून उत्पन्न होते. अणू फ्यूजन वास्तवात सूर्यावर होते आणि याच आधारावर चीनचा एचएल-२ एम बनवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button