कोरोनामुळे चीनचा मोठा निर्णय, भारतातून येणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

xi-jinping

नवी दिल्ली : कोविड (COVID-19) साथीच्या आजारामुळे चीनने (China) भारतातून (India) येणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. गेल्या आठवड्यात वंदे भारत मिशनच्या अंतर्गत एअर इंडियाच्या (Air India) दिल्ली-वुहान विमानाने प्रवास करणाऱ्यांची ३० ऑक्टोबरला कोरोना चाचणी घेतली होती. त्यातील २० जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एआयने १३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या काळात चीनसाठी चार उड्डाणांची योजना आखली होती ज्यावर आता परिणाम होऊ शकेल.

हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नसून याआधी इतर देशांसंबंधीही असा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून चीन पावलं उचलत आहे. भारताशिवाय ब्रिटेन, बेल्जिअम आणि फिलिपाइन्समधून नागरिकांनाही चीनमध्ये प्रवेशबंदी आहे. याशिवाय फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील नागरिकांना प्रवेश करण्याआधी वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्याचा आदेश आहे.

चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER