चीनच्या Sinovac लसीला आपत्कालीन वापरासाठी डब्लूएचओकडून मान्यता

china-sinovac-vaccine-approved-by-who-for-emergency-use

मुंबई :- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आतापर्यंत अनेक लसींना मान्यता दिली आहे. अनेक कंपन्यांनी कोरोना विरोधी लस तयार केली आहे. त्यातच आता डब्लूएचओने चीनच्या साइनोव्हॅक बायोटेक (Sinovac) या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. डब्लूएचओने मान्यता दिलेली चीनमधील ही दुसरी लस आहे. तज्ज्ञांच्या मते १८ वर्षांवरील लोकांना ही लस देण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये २ ते ३ आठवड्यांचा फरक ठेवून ही लस देण्यात येणार आहे. डब्लूएचओ दोन महिन्यांत चीनच्या दोन लसींना मान्यता दिली आहे.

एप्रिल महिन्यात चीनच्या सिनोफार्मा (Synopharma) या लसीला डब्लूएचओने मान्यता दिली होती. AFP ने दिलेल्या माहितीनुसार, चीनव्यतिरिक्त २२ देशांमध्ये ही लस आधीपासून वापरात आहे. ज्यात चिली, ब्राझील, इंडोनेशिया, मॅक्सिको, थायलँड आणि तुर्की या देशांचा समावेश आहे.

दरम्यान भारतातील भारत बयोटेकची कोवॅक्सिन (Covaxin) लस आपत्कालीन वापरासाठी डब्लूएचओकडून मान्यता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत नोंद करण्यासाठी भारत बायोटेकने ९० टक्के कागदपत्रे WHOकडे जमा केली आहेत. डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकने १९ एप्रिल रोजी EOI सादर केले आहे. त्या संदर्भात आणखी काही माहिती देणे आवश्यक आहे. जून महिन्यात कोवॅक्सिनला डब्लूएचओकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, असे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button