राजीव गांधींच्या काळापासून चीन भारतीय भूभागावर कब्जा करतो आहे; तापिर गाओ यांचा काँग्रेसला टोमणा

Tapir Gao - Rajiv Gandhi

अरुणाचलप्रदेशच्या सीमावर्ती भागात चीनने गाव वसवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अरुणाचलप्रदेशमधील (Arunachal Pradesh) भाजपा (BJP) खासदार तापिर गाओ (Tapir Gao) यांनी काँग्रेसवर (Congress) टोमणा मारला – “राजीव गांधींच्या (Rajiv Gandhi) काळापासून म्हणजेच ८० च्या दशकापासून चीन भारतीय भूभागावर कब्जा करतो आहे.”

“चीनकडून गाव वसवले जाणे, भारतीय सीमेजवळ सैन्य शिबिर घेणे हे काही नवीन नाही. ८० च्या दशकापासून आजपर्यंत चीन सातत्याने भारतीय भूभागावर कब्जा करतो आहे. आज आपण काँग्रेस सरकारांच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम भोगत आहोत. काँग्रेस सरकारची धोरणे चूक होती, अशी टीका तापिर गाओ यांनी केली.

त्यांनी ट्विट केले – चीन ८० च्या दशकापासून रस्ते तयार करण्याच्या मागे लागला आहे, त्यांनी लोंग्जूपासून माजापर्यंत रस्ता तयार केला आहे. राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात, चीनने तवांगमध्ये सुमदोरोंग चू घाटीवर कब्जा केला होता. यावर तत्कालीन लष्करप्रमुखांनी एका ऑपरेशनची योजनादेखील आखली होती. मात्र राजीव गांधींनी त्यांना पीएलएला परत पाठवणाऱ्या त्या योजनेवर काम करण्याची परवानगी नाकारली.

काँगेसच्या सरकारांनी सीमेपर्यंत रस्ते बांधले नाहीत. यामुळे तीन-चार किलोमीटरचा बफर झोन राहिला. या भूभागावर चीनने कब्जा केला. चीनकडून अरुणाचलमध्ये गाव वसवणे हे काही नवीन नाही. हे तर काँग्रेसच्या काळापासून चालत आले आहे, असे खासदार तापिर गाओ यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER