चिमणी गिधाडांना भारी पडली, ट्विटरच्या आडून जितेंद्र आव्हाड यांची केंद्रावर टीका

Maharashtra Today

मुंबई : केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करायची होती. ट्विटरने याचे पालन केले नाही, यावरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या संघर्ष निर्माण झाला आहे.

यासंदर्भात केंद्राकडून ट्विटरला वारंवार सूचना देण्यात आली होती, पंरतु ट्विटरने नियम पालनास नकार दर्शवला. त्यामुळे केंद्राने ट्विटरला अंतिम नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष विकोपाला गेला(Jitendra Awhad criticized the center from under Twitter) आहे.

केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील या संघर्षावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक दृश्य ट्विट केले आहे. चिमणी हा ट्विटरचा लोगो आहे. या ‘लोगो’ला भगव्या रंगाने वेढा दिला असल्याचे दाखवण्यात आले. त्यातच ट्विटर हे नाव दिले आहे. या फोटो सोबत एक ओळही आव्हाड यांनी लिहिली आहे. “चिमणी गिधाडांना भारी पडली” जितेंद्र आव्हाड यांनी संकेतातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button