चिंबीपाडा आरोग्य केंद्रात तीन महिन्यापासून औषधेच नाही

ashok

ठाणे / प्रतिनिधी :- ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग सर्व सोयी सुविधांनी व पुरेशा औषधे देखिल उपलब्ध असल्याचा दावा करीत असते. मात्र, चिंबीपाडा या आरोग्य केंद्रावर मागील तीन महिन्यापासून औषधच उपलब्ध नसल्याची बाबा जि.प. सदस्य अशोक घरत यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आणली. यावेळी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून औषधे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी नियोजन भवन सभागृहात पार पडली. यावेळी भाजपचे जि.प. सदस्य अशोक घरत यांनी गणपती विसर्जनासाठी चिंबीपाडा येथे गेले. असता, त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍याला अचानक त्रास होवू लागल्याने त्यांनी चिंबीपाडा आरोग्य केंद्रात धाव घेतली. यावेळी तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी औषधेच उपलब्ध नसल्याची माहिती घरत यांना दिली. तसेच तीन महिन्यात तीन वेळा पत्र देवून ही जिल्ह्यावरून अद्यापही औषधे प्राप्त झाले नसल्याची माहिती संबंधीत डॉक्टरांनी दिली. ही गंभीर बाब जि.प. सदस्य घरत यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आणली. तसेच संबंधीत आरोग्य केंद्राकडून करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती देखिल सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच गरोदर महिलेला दुसर्‍या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहीका नसल्यामुळे गर्भातच बाळांचा मृत्यु झाल्याची बाब सभागृहात उघडकीस आली. यावेळी अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी ब.भी. नेमाने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितल्यानंतर सभागृह शांत झाला.

ही बातमी पण वाचा : रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण