औरंगाबाद : खेळतांना २ बालके तलावात बुडाल्याची चर्चा, शोध सुरू

children drown Near Pipri Lake

औरंगाबाद : मिसारवाडी परिसरातील पिपरी तलावाजवळ खेळण्यासाठी गेलेली दोन बालके बुडाल्याची घटना (दि. १९) सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पाण्यात बुडालेल्या बालकांची कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. मिसारवाडी परिसरातील पळशी गावात असलेल्या पिपरी तलावाजवळ काही बालके सायंकाळच्या वेळी खेळण्यासाठभी गेली होती. त्यापैकी अंदाजे १२ वर्ष वयाची दोन बालके पाण्यात बुडाली. असा हा प्रकार काही नागरीकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला व पोलिसांनी दिली.

औरंगाबाद: दारुड्याचा पोलिस ठाण्यात गोंधळ