तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा मुलांना धोका नाही; डॉ. गुलेरिया यांचा दावा

Children - Coronavirus Third Wave - Dr. Randeep Guleria

नवी दिल्ली :- कोरोनासह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचा आजाराने देशभरात थैमान घातला आहे. आतापर्यंत हजारोंना याची लागण झाली आहे. कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचे संकट अद्याप ओसरले नाही. मात्र, काहीशी रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. सरकार आणि प्रशासनाला तिसऱ्या लाटेची चिंता आहे. या तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मुलांना होणार नाही, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी स्पष्ट केले आहे. या दाव्यानंतर पालकांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

“कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रभावित झाले नाहीत. यामुळे तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना धोका असेल, असे वाटत नाही किंवा तसे कोणते संकेतही मिळालेले नाहीत. यामध्ये लहान मुले सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. तसेच मुलांना कोरोना झाला तरी लक्षणे सौम्य आहेत.” असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या लाटेचा संसर्ग लहान मुलांना जास्त होऊ शकतो. मात्र, मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे, याचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

‘ब्लॅक फंगस’ (Black Fungus) हा संसर्गजन्य नाही
‘ब्लॅक फंगस’ हा संसर्गजन्य आजार नाही. कोरोनाप्रमाणे हा आजार एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रसार होत नाही. हा आजार मधुमेहग्रस्त लोकांना सर्वाधिक होण्याचा धोका असतो. ‘ब्लॅक फंगस’चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या आजारावर लवकर उपचार केल्यास फायदा होतो, अशी माहिती डॉ. गुलेरिया यांनी दिली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button