आंबे खाल्ल्यावर मुलं होतात छाप विधाने करणाऱ्यांनी संकटकाळात दिशाभूल करू नये, अन्यथा… जयंत पाटलांचा भिडेंना टोला

Jayant Patil - Bhide Guruji - Maharastra Today

मुंबई : राज्य सरकार आणि समाज कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. अशा वेळी आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असतील तर ते अयोग्य आहे. एरवी अशी वक्तव्यं खपून जातात. पण सध्याच्या काळात अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचं गांभीर्य कमी होतं. कोणीही उठून काहीही बोलायला लागले तर सरकार आणि समाजाकडून सुरू असणाऱ्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण होईल.

त्यामुळे अशी वक्तव्यं कायद्याच्या दृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. ते रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटकाळात समाजात गैरसमज करणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा रोखठोक इशारा दिला. सध्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांना वेगळ्या दिशेला नेणे अयोग्य आहे, असे पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button