“आई मला खेळायला जायचय,…….!”

काही दिवसांपूर्वीचा श्री .नागनाथ मंजुळे यांचा मराठी सिनेमा “नाळ ” हा कितीदा ही बघितला तरी तो मनाला भावणारा आहे. विशेषतः मनाला आवडतं, त्यातील छोट्या मुलाचं मनसोक्त बागडणं, मनमुराद बालपण (childhood) अनुभवण, म्हशीच्या छोट्या पिल्ल्या बरोबर, कोंबड्यान बरोबर खेळणं. रुईच्या झाडातून उडणाऱ्या” म्हाताऱ्या वर “फुंकर मारत, सुळकन नदीत पोहायला सुर मारणं. प्रत्येकाला मनातून वाटत असणार की, हो ! बालपण असावं तर असं !

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, 18 सप्टेंबर 2020 रोजी शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्याकरता महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय आला. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2021 – 22 वीस च्या प्रवेशासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं केले आहे. म्हणजेच आता पहिलीच जाणारी मुलं ही जून पासून डिसेंबर पर्यंत आपल्या वयाची सहा वर्ष पूर्ण करतील. त्यानुसार साडे पाच वर्षाचे मुल हे आता जून मध्ये पहिलीत असेल. बरेच जणांना असेही वाटेल कदाचित, वर्ष-सहा महिन्यांनी काय फरक पडणार आहे ? चांगला आहे की निर्णय !

पण त्याच्या संदर्भात पुढे हिशोब केला, तर पहिलीत जाण्याआधी तीन वर्ष म्हणजे वय वर्षे अडीच असलेल्या मुलाला पूर्व प्राथमिक च्या वर्गात प्रवेश द्यावा लागेल. पण खरंच अडीच वर्षाचं वय पूर्वप्राथमिकसाठी आणि साडेपाच हे वय पहिल्या वर्गासाठी योग्य आहे का?

वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या याच्या परिणामांच्या अभ्यासानुसार (इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी) पहिलीचे प्रवेशाचे वय सहा हेच योग्य आहे. आणि ते तसंच असायला पाहिजे असं म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोना काळातील बालपण — ” आणि हे सहजतेने साध्य करू या!”

शाळा सुरू होण्याच्या वेळी अनेक पालकांसमोर प्रश्न पडतात की ,कधी शाळेत घालावं ?कुठल्या शाळेत घालावे ? मराठी माध्यम की इंग्लिश ? या सगळ्याच बाबतीत पालक खूप जास्त सजग झाले आहेत खरे! पुढच्या आयुष्यात मुलांसमोर असणारी स्पर्धा पालकांनाच खूप panic करते आहे. अभ्यासात आणि कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात “चमकवण्यासाठी ” ते अथक प्रयत्न करतात आजारी मुला-मुलींना औषध पाजून स्पर्धेत उतरवतात आणि मेडल मिळवतात. हा एक पैलू!

दुसरी बाजू म्हणजे सध्याची सामाजिक परिस्थिती! ही देखील याला खूप कारणीभूत आहे. पूर्वी घरात कमीत कमी चार-पाच जण होते. तोपर्यंत मुलं सांभाळणे खरच सोपे होते .आजी ,आजोबा आत्या, काका या सगळ्यांबरोबर मूल वेगवेगळ्या गोष्टी शिकायचे .आजूबाजूला खेळायला ताई-दादा असायचे .त्यामुळे त्यांचे सामाजिकीकरण करण्यास कठीण नाही जायचं. पण आजची विभक्त कुटुंब पद्धती व त्यात आई-वडील दोघेही कामाला जाणारे असतील, तर मग विचारायची सोय नाही !मग इतरां बरोबर राहण्याची सवय लावण्यासाठी, प्ले ग्रुप ला घालणे हा एकमेव मार्ग राहतो. सकाळपासून रात्रीपर्यंत ,आई एकटीच मुलाला सांभाळून दमून जाते. त्यामुळे दोन-तीन तास सुटका म्हणून ती मुलाला प्ले ग्रुप ला अडकवते.

मुलांच्या पहिल्या वर्गाच्या अभ्यासक्रमांमध्ये मुलाला वाचता आणि लिहिता बऱ्यापैकी येणे अपेक्षित आहे. त्यात अडचण अशी येते की पहिल्या वर्गात येणारी मुले खूप वेगवेगळ्या परिस्थितीतून येतात. वातावरणातून सुद्धा येतात .कुणी अंगणवाडीतून ,कोणी मराठी बालवर्गातून ,सिनियर केजी मधून तर कुणी थेट पहिल्या वर्गातच ऍडमिशन घेते. अशा “व्हरायटी “असलेल्या मुलांना सांभाळणे हेच पहिल्यांदा शिक्षकांसमोर मोठे आव्हान असते. काही शाळांमधून फोनेटिकस पद्धतीने शिकवतात काही मधून नाही, अशी शिकवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यामुळे एकसूत्रता आणण्याचा हेतूही ही साध्य होत नाही.

यातून पालकांच्याही शाळांकडून खूप सारे अपेक्षा असतात एवढी फी भरून शाळेत टाकल्यानंतर मुलाला लगेचच पटपट लिहिणे वाचणे आले पाहिजे कुठे मागे राहू नये असं त्यांना वाटतं. शेवटी शाळांचाही नाईलाज असतो या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बालमानसशास्त्र बाजूला ठेवून मागणी तसा पुरवठा ठेवावा लागतो.

खरतर मुलांच्या वाढीच्या आणि विकासाच्या विविध टप्प्यांवर ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या ओपचारिक शिक्षणात मिळू शकत नाही पहिला बऱ्यापैकी छोटे शब्द लिहिता वाचता यावे छोटी वाक्य लिहिता येणे अपेक्षित असतं. असं जर असेल तर जेवाय पाटीवर भिंतीवर बिनधास्त रेघोट्या ओढण्याचे असते, त्या ऐवजी वहीत पाणी भरून भरून स्टॅंडिंग लाईन स्लीपिंग लाइन काढायच्या आणि त्याही तासंतास एका जागी बसून ! केवढा मोठा कोंडमारा होत असेल या मुलांचा! साडे दहा मिनिट एवढा ही एकाग्रतेचा span ही मुलांचा नसतो, त्यांनी कसा बसावे एक एक तास ?

अडीच ते तीन या वयात हाताचे आणि बोटांचे स्नायू विकसित झालेले नसतात, फाइन मोटर मद्रास मोटर स्किल्स नुसार करावे लागतात त्यासाठी विशिष्ट ऍक्टिव्हिटीजची रचना प्ले ग्रुप नर्सरीच्या वर्गांच्या अभ्यासक्रमात असते. पण पालकांच्या अट्टाहास अनुसार जर सरळ लिहायला सुरुवात केली तर मुलांचे अक्षर तर बिघडतेच पण “लिहिण्याचा कंटाळा करतो “ही जी पुढे चालून समस्या बनते, तिचे मूळ इथे असते !

तसेच अडीच ते सहा वर्षे वयाच्या मुलांना ,आई वडिलांचा किंवा इतर जवळच्या नातेवाईकांचा सहवास ,आजी आजोबा इत्यादीचा गरजेचा असतो. तिथे त्यांना उबदार आणि सुरक्षित वाटते .पण अशा मुलांना प्री-प्रायमरीला आणि शाळेला पाठवले ,तर मुलांमध्ये seperetion anxity निर्माण होण्याचा धोका असतो. कारण मुलांच्या वाढीच्या टप्प्यांपेक्षा अधिक क्षमतेची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते ,ही स्थिती त्यांना ताण आणणारी असते .त्यातूनही एंग्जायटी वाढीस लागते.

वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मुला-मुलींमधील विविध क्षमतांमध्ये प्रत्येक दिवसाला फरक पडत असतो. मेंदू विकास आणि त्यासाठी अनुकूल, आनंददायी अनुभवांचं वातावरण हे भावनिक वाढीस खूप गरजेचं असतं.मुलांच्या सहज शिक्षणाबाबतही असं सांगता येईल की जर मुलांना या वयात पूर्ण स्वातंत्र्य मिळालं ,तर मूल आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक गोष्टी जाणून घेते. ताण रहित मोकळं आणि सुरक्षित वातावरण, एवढंच फक्त त्यांच्या सक्षम विकासासाठी आवश्यक आहे. त्यातून मुलांची जिज्ञासा ,कुतूहल ,कल्पनाविलास ,नवनिर्मिती हे सगळ आपोआप होत जातं. असे अनौपचारिक शिक्षण मुलांसाठी पुढील आयुष्यात एक ठेवाच असतो.

पण दुर्दैवाने पालक आज या महत्वाच्या बाबतीतच सजग दिसत नाहीत. म्हणूनच आपल्या शाळा, त्यातील शिक्षण,त्याला अनुसरून मोठाली दप्तर, त्यानंतर ट्युशन्स ,अशा रूटीनमध्ये मुलं” घर नावाच्या विद्यापीठातील शिक्षण ” विसरून गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER