“कोरोना काळातले बालपण –“(भाग 2)

"आम्ही रोल मॉडेल !"

Psychological Science and COVID-19

कालच्या लेखांमध्ये, एका सर्वेनुसार सद्यपरिस्थितीत केवळ एका शिक्षण पद्धतीतील बदलामुळेच मुलांच्या बालपणावर दुष्परिणाम होतात आहेत असं नाही,तर एकूणच परिस्थितीमुळे त्यांच्या भावनिक विश्वावर, मानसिकतेवर झालेले परिणाम आपण बघितले. यात पालक शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था आणि समाज म्हणूनही सर्वच स्तरावर प्रयत्न करायला हवे आहेतच. त्या पार्श्वभूमीवर समाजाचा एक घटक म्हणूनही, आपण प्रत्येकाने याच्यावर विचार करायला हवा असं लक्षात आलं!

त्यामध्ये मला पहिल्यांदा लक्ष द्यावं असं वाटतंय, ते घराघरांमधून वाढलेल्या ताणतणावांवर ! कारण मुले ही सध्या घरी आहेत. ज्या वातावरणात ती वाढतात त्या वातावरणाचा त्यांच्यावर कसा परिणाम होत असतो हे आपण मागील एका लेखामध्ये बघितले आहेच. मुले अगदी टीप कागदा प्रमाणे सगळ्या कृतींवर लक्ष देत असतात. आपण एकमेकांसाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्या कृतीमधून ती शिकत असतात. जसे की रणवीरच्या बाबांनी home quarantine असलेल्या त्याच्या एका काकांसाठी आठवणीने डिस्पोजेबल कप्स, डीशेश ,oxymeter,वाफेचे मशीन नेऊन दिले.त्या आजीला काळजी वाटू नये म्हणून तब्येत बघायला बाबा दररोज एक चक्कर मारतात. या कृतीने रणबीरला पक्क लक्षात राहिल राहिलं की कुणासाठी काहीतरी कसं करायचं असतं !आणि एकमेकांची काळजी कशी घ्यायची असते !

आई घरातल्या स्वयंपाकवाल्या मावशीशी बोलून तिचं टेन्शन हलका करायला कशी मदत करते, किंवा उदबत्ती विकणाऱ्या दादा कडून गरज नसतानाही शंभर दोनशे रुपये च्या वस्तू विकत घेते, तेव्हा ज्यांच्याकडे काही नाही अशा माणसांना मदत केली पाहिजे, समाजऋण परत केलं पाहिजे हे मुलांना समजतं. भलेही त्यांना आता समाजऋण या शब्दाचा अर्थ कळणार नाही!

ताण वाढण्याला ही सध्याची परिस्थिती पूर्ण अनुकूल आहे. अगदी चोवीस तास एकत्र असल्याने सुद्धा चिडचिड होऊ शकते. प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते ज्यामुळे ती व्यक्ती तिचं म्हणून काही करू शकेल. पण सध्या नोकरीची चिंता आर्थिक ताण आजाराची भीती, चिंता या सगळ्याच बाबतीत अस्थिरता, असुरक्षितता एकीकडे आणि दुसरीकडे घरातील स्त्रीवर सगळे घरी आणि कामवाल्या येऊ शकत नसल्यामुळे वाढलेला कामाचा ताणही जबरदस्त आहे ,मुख्य म्हणजे हा काळ वाढतच जातो आहे .त्यामुळे आता ही कामे करून कंटाळा आणि थकवा आला आहे. आपोआपच परस्परांवर ही चिडचिड होते. घरात वडील मंडळी असली तर त्यांच्या तब्येतीची काळजी असते. ज्यांचे आई-वडील एकटे दूर राहतात किंवा ज्यांची मुले शिक्षणासाठी नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या देशात अडकली आहेत. त्यांना आपल्या या आप्तांची चिंता भेडसावते.

त्यातून शालेय मुले ज्यांच्यात मुळातच भरपूर एनर्जी असते. ती कशी बाहेर काढावी हा इतर वेळीही प्रश्न असतो .या परिस्थितीमध्ये मुले आता बाहेर जाऊ शकत नाही मग भावाबहिणींची भांडण मारामाऱ्या ,रडणे ,चिडणे हे आलेत यामुळे पालक हैराण होऊ शकतात.

फ्रेंड्स ! तुम्ही म्हणाल ,हो हो ! हेच सगळं होत आहे, पण करायचं काय यावर ? तर त्यावरच आपण बोलणार आहोत. जेव्हा आपल्याला ताण का उत्पन्न होतोय हे कारण कळेल, तेव्हाच तर त्यावर आपण उत्तर शोधू शकू!

या सगळ्या मागे महत्त्वाच्या दोन गोष्टी येतात १) परिस्थितीचा स्वीकार..२) अनिश्चिततेचा स्वीकार.

*सध्याच्या मनस्थिती मागे जी अनिश्चितता आहे, आन्सरट् टी आहे, ती आपल्याला विशेष त्रास देते आहे. खरतर अनिश्चितता ही तर दररोजची असते. पण ती आपल्या सवयीची असते पण आत्ताची जी अनिश्चितता आहे ती वेगळ्या प्रकारची आहे.
*दुसरा भाग परिस्थिती बाबतचा स्वीकार! सुरुवातीला अगदी हा कालावधी सुरू झाला, तेव्हा थोडी भीती होती, आश्चर्य होतं .नंतर लोक थोडे सरावले .इट्स ओके! नुसतेच करोना ग्रस्तांचे आकडे दिसत होते .आपल्या ओळखीत ,नातेवाईकांमध्ये, शेजारीपाजारी पेशंट दिसत नव्हते .पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता जेव्हा तेच घराघरातून ,आपल्याला जवळून दिसू लागले. तेव्हा तर सगळेच चांगले गांगरले आहेत.
त्यासाठी सर्वप्रथम या परिस्थितीचा स्वीकार ठरवून करायला हवा ! कसा? तर हा स्वीकार आपल्याला दोन स्तरांवर करावा लागेल.

*एक म्हणजे शारीरिक, बायोलॉजिकल स्थरावर .सध्या आपण ऐकतो आहे की हा वेंटिलेटर वर आहे, तो आयसीयूत आहे, आणि मग भीती वाटते की मला संसर्ग झाला तर? अशी ही आरोग्याची चिंता.

*दुसरा म्हणजे भावनिक, आर्थिक ,मानसिक किंवा ज्याला आपण मनोसामाजिक म्हणू. यात आपल्याला समाजात वावरायला बंधने आलेली आहे. जीवनशैलीत बदल करावा लागतो आहे

# मग जर परिस्थितीचा स्वीकार ठरवून करायचं असेल तर काय करायचं? तर माझ्या नियंत्रणातील घटक कुठले ,आणि माझ्या नियंत्रणा बाहेरचे घटक कोणते ?याचा सतत विचार करत रहाणे. यावर सतत काम करत राहणे. मग जी जी काय म्हणून मला काळजी घेता येईल ती काळजी घ्यायची आहे. कुटुंबीयांच्या तब्येतीची ,त्यांच्या आहाराची, त्यांच्या व्यायामाची ,आणि ती समरसतेने घ्यायची आहे. काळजी घेणे आणि काळजी करणं या दोन्हीही ही ट्रॅक्ट वर आपले विचार चालूच राहणार आहे हेही स्वीकारावं लागेल. पण म्हणून जास्तीत जास्त विवेकाने विचार करून आपले काम चालू ठेवावं लागेल.

# बरेच जणांना वाटतं या काळामध्ये पॉझिटिव राहायचं कसं ? सारखे निगेटिव्ह विचार येतात! त्यासाठीही पहिल्यांदा निगेटिव्हिटी विच्याराचा स्वीकार करावा लागेल. मग दुसरी पायरी असेल कळून नकारात्मकता कमी करायची, आणि काहींचे उदात्तीकरण सब्लिमेशन करायचं! म्हणजे काय? तर उदा. युवराजसिंग ने जेव्हा सिक्स सिक्सेस मारल्या तेव्हा त्या अगोदर त्याला अँड्र्यू फ्लिंटॉफ यांनी चिडवलं होतं. तो राग दूर करण्यासाठी त्याने ही कामगिरी केली.

जेव्हा आपण पॉझिटिव्हली विचार करू तेव्हा ही लक्षात ठेवावे लागेल की सकारात्मकता ही सुद्धा गतिमान परिस्थिती आहे ,डायलेमिक आहे. हा स्वीकार केल्यानंतर जास्तीत जास्त आशावादी, पण वास्तवात राहून आपण वागू शकतो.

# यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विचार येतात ते व्यक्त व्हायला हवेत .कुणाजवळ ?तर दरवेळी आपल्याला प्रोफेशनल्सची मदत मिळेल असं नाही ,तर अशी एक व्यक्ती निवडायची जी आपला अनकंडिशनल स्वीकार करते! व्यक्ती ही व्यक्त होण्याची जागा आहे हे विसरता कामा नये. अर्जुनाला शस्त्र टाकून बसलेल्या ज्याप्रमाणे कृष्णाने सावरले होते तशीच भूमिका ती व्यक्ती पार पाडेल. परंतु आपण आता एक परस्परांशी ठरवायचं की आपल्या भूमिका कधीकधी चेंज करावे लागतील! लहान मुले खेळतात तसं, कधी तू कृष्ण व्हायचं, तर कधी मी कृष्ण होईल. कारण या समस्या आपल्या सगळ्यांनाच येणार आहे.

# अनिश्चिततेचेबाबत ,त्यामुळे येणाऱ्या चिंतेबद्दल बोलायचं तर,”One day at a time !”हा उपाय सध्याच्या अनिश्चिततेच्या कालखंडाबद्दल ठेवता येईल .आजच्या दिवशी फक्त आजचाच विचार करायचा. आणि वन डे एट ए टाईम, वगैरेसारख्या इन्फर्मेशन केवळ घोकायची गोष्ट नाही,तर आपल्या दिनचर्येत याचा वापर कसा करता येईल हे बघायचं म्हणजेच” आज”जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल ते बघायचं!

आजच्या लेखात सध्या ताण का येऊ शकतो ?आणि तो घालवण्यासाठी कोणत्या दोन तीन गोष्टी वर विचार करून ,त्या अमलात आणावे लागतील, ते बघितलं .उद्याच्या लेखात आपण ताणमुक्त झाल्यावर घरातील सगळ्यांनी मिळून एक रुटीन आखताना कुठल्या गोष्टींचा विचार करता येईल ते बघू या!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER